कै. सुंदरलाल वर्धासा (सावजी) कळमकर
जन्मतिथी :- दिनांक २० जानेवारी १९१७
शिक्षण :- उस्मानिया युनिव्हर्सिटी हैद्राबाद येथून वकिलीचा अभ्यास पूर्ण केला.
कारकीर्द :- महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्रता आंदोलनात सहभागी झाले. सन १९५४ साली जिल्ह्यातील पहिला दलित विद्यार्थी आश्रम सुरु करून सामाजिक सेवेचे व्रत हाती घेतले . जिंतूर येथे अनेक सहकारी संस्थांची स्थापना केली. शिक्षणाचे महत्व जाणून त्यांनी अनेक शाळांची स्थापना केली. १९५७ ते १९७० या काळात परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष्यपद भुषविले. १९६५ साली जिंतूर को-ऑपरेटीव्ह बँकेची स्थापना केली. (सध्याची सुंदरलाल सावजी बँक ) १९६७ ते १९७२ महाराष्ट्र विधान सभेचे सदस्य (आमदार) झाले. जैन तीर्थ क्षेत्र नेमगिरीचे दशक भर अध्यक्ष पद भूषविले. अनेक सामाजिक, धार्मिक, राजकीय उपक्रमांमध्ये त्यांचा आयुष्यभर सहभाग राहिला. दिनांक २६ नोव्हेंबर २००२ रोजी साहेब अनंतात विलीन झाले. पण त्यांनी सुरु केलेले समाजसेवेचे रोपटे आता वट वृक्ष बनलेले आहे. त्यांनी उभारलेल्या अनेक सामाजिक, सहकारी व शैक्षणिक संस्थेच्या रूपाने ते आजही आमच्यातच आहेत.